Ad will apear here
Next
हिमायतनगर तालुक्यात सरासरी ७२ टक्के मतदान
किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत


हिमायतनगर :
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात सरासरी ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी पाऊस सुरू असूनही, शेतकरी आणि शेतमजुरी करणाऱ्या मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.



तालुक्यातील आंदेगाव, वडगाव, बोरगडी ताडा, हिमायतनगर, काडली बुद्रुक येथील केंद्रांवर ‘ईव्हीएम’मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता; मात्र मशीन त्वरित बदलल्याने मतदान सुरळीत सुरू झाले. ४५० कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात ७९ हजार ८०० मतदार असून, ९० केंद्र होती. त्यापैकी दोन केंद्रे संवेदनशील होती, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी एन. बी. जाधव यांनी दिली. तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य राखीव दलाचे जवान आणि छत्तीसगड येथील पोलिस तैनात करण्यात आले होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी दिली.

शिवसेना-भाजप-‘रिपाइं’चे उमेदवार नागेश पाटील-आष्टीकर, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माधवराव पाटील-जवळगावकर, अपक्ष उमेदवार बाबूराव कदम-कोहळीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. श्याम भारती यांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले आहे. २४ तारखेला यांपैकी कोण विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZTUCF
Similar Posts
हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील यांचा प्रचार वेगात हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांचा प्रचार दौरा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आमदार नागेश पाटील यांच्या प्रचारात मुस्लिम बांधवांचा मोठा सहभाग हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले गंगाधार पाटील-चाभरेकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेसमधील मुस्लिम समाजाचा मोठा गट नाराज झाला. मुस्लिम समाजातील अनेकांनी आमदार नागेश पाटील आणि गंगाधार पाटील-चाभरेकर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला
हा माझा नव्हे, सर्वसामान्य जनतेचा विजय : माधवराव पाटील हिमायतनगर : ‘विधानसभा निवडणुकीत झालेला विजय माझा नसून, सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. मी पद मिळण्यासाठी आमदार झालो नाही. या भागातील मागील पाच वर्षांचा ‘बॅकलॉग’ भरून काढायचा आहे. तुमच्यासोबत समस्यांची चर्चा करून त्या सोडवण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. मी आमदार झाल्यामुळे मला वेगळे समजू नका
माधवराव पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या घरोघरी भेटी हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार माधवराव पाटील-जवळगावकर यांच्या प्रचारार्थ नेते आणि कार्यकर्ते घरोघरी भेटी देण्यावर भर देत आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language